मनाची अमर्याद शक्ति
आपण आपल्या मनाची अमर्याद शक्ति ओळखत नाही, कारण तसे आपण आपल्या मनाकडे जास्त लक्ष देत नसतो, किंवा दुर्लक्षित असतो. पण ही मनाची शक्ति आपण ओळखली पाहिजे, आता ही शक्ति कोणत्या स्वरूपात आहे हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. नैसर्गिक स्वरूपात ती सगळीकडे भरलेली आहे. तेच तत्व आपल्या शरीरात असते, पण जो पर्यन्त आपण त्या शक्तीच्या स्वरूपाला ओळखत नाही किंवा तिच्या तत्वा पर्यन्त आपण पोहोचत नाही तो पर्यन्त आपल्याला तिची ओळख होणार नाही. आता सर्वसामान्य मनाला प्रश्न पडतो, ओळखावे कसे?
याला कारण असे आहे की त्या शक्तीच्या मुळ गाभ्यापर्यंत आपण पोहोचत नाही हे आहे. ते तत्व पाहण्यासाठी आपल्याला त्या तत्वशी एकरूप व्हावे लागेल, त्याचा मूळ आशय समजला पाहिजे. रामकृष्ण परमहंसना त्या तत्ववाशी एकरूप होता आले तेच शक्तीचे स्वरूप स्वामी विवेकानंदणा समजायला वेळ लागला. हे समरूप होण्याचे लक्षण आहे. त्या तत्ववाशी समरस होता आले पाहिजे. तेव्हा कुठे त्याचे स्वरूप आपल्याला उमजेल हे निश्चित. रामकृष्ण स्वामी विवेकानंदणा म्हणत “ आई माझ्याशी बोलते, तुझ्या बरोबर का बोलत नाही ” याला कारण हे होते की स्वामी विवेकानंद त्या तत्ववाशी एकरूप व्हायचे होते, तोपर्यन्त त्यांना ते शक्ति-स्वरूप कसे दिसावे? कालांतराने रामकृष्ण परमहंसणी स्वामींना त्या तत्वाशी एकरूप केले. जो पर्यन्त समुद्राचे पाणी खारट आहे हे चव घेतलयाशिवाय जसे कळणार नाही, तसेच आपल्याला त्या तत्वाशी एकरूप झाल्याशिवाय त्याचे स्वरूप समजणार नाही.
रसायनशास्त्र मध्ये केमिकल बॉंडिंग असते, बाहेरचा ओरबीट मध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात, जो पर्यन्त त्याच्याशी एकरूप होणारा समरूप इलेक्ट्रॉन त्याच्याशी संयोग होत नाही तो पर्यन्त केमिकल बॉन्ड होत नाही. तसेच आपल्या मनाचे काहीसे आहे. आपल्या मनामध्ये बरेच वैचारिक तत्वे असतात, काही चांगले असतात काही वाईट. तुम्ही कोणत्या तत्वाशी मनाने एकरूप होणार ह्यावर ते अवलंबून असते. मनाची शक्ति कोणत्या स्वरूपात प्रकट होईल, हे त्या स्थितिवरुण समजू शकते.
कराटे खेळाडू, एखादी मजबूत लादी फोडायची असेल, त्यावेळी आपण पाहतो तो त्याच्या मनाची तयारी करत असतो, दोन तीन वेळ तो मजबूत इराद्याने हाताची अॅक्शन करत असतो, हे तो त्याच्या मजबूत मनाची तयारी करत असतो, इथे मनाचे प्रचंड बळ त्याच्या हातात तयार होत असते, तसेच त्याची आता पर्यंतची मेहनत हे असे मिळून एक प्रचंड बल तेथे निर्माण होते, जेव्हा त्याचे मनाचे बल आणि त्याची हाताची ताकत एकवटून तो त्या लादिवर प्रहार करतो, तेव्हा त्या लादीचे दोन भाग झालेले आपण पाहतो. हीच ती मनाची प्रचंड शक्ति असते.
विख्यात ब्रूस-ली यांचा दोन इंच पंच फेमस आहे, यामध्ये पण मनाची प्रचंड शक्ति दडलेली आहे. डोळ्यातून प्रचंड आत्मविसवास समोरच्या व्यक्तीवर फेकत एकप्रकारचे हिपनो-टीजम मन तयार करून अधिक आपल्या हाताचे प्रचंड बल त्या व्यक्तीवर आघात करून त्याला दूर फेकण्याची पद्धत ही पण एक मानवी मनाची प्रचंड शक्ति दर्शविते. या सर्व ‘मनाच्या शक्ति’ आणि त्याचे परिणाम आहेत. यातून मनाचे प्रचंड बल आपल्याला दिसते.
आता मनाचे बल लवचिक सूक्ष्म रूपात आपण पाहू, ही पण एक मनाची प्रचंड पकड आहे जी आपल्याला सत्वगुनात दिसून येईल. संत-महातम्यान मध्ये या शक्तींचा प्रभाव दिसून येतो. सर्व-सामान्य लोकांना दिसून न येणाऱ्या गोष्टी संत-महातमयांच्या नजरेत दिसतात. काही वेगळेपण त्यांच्यात दिसून येते. काही सूक्ष्म शक्ति त्यांच्यात वावरत असतात, हे सर्व त्यांचे अंतर्मन वृंदीनगत झालेले लक्षण असते. अंतरमनाचा सृष्टीतील शक्तीशी ताळमेळ बसलेला असतो. बाह्य जगात यांचा वावर असला तरी ते नेहमी त्या सुप्त शक्तींच्या सानिध्यात असतात. बाह्य मनावर त्यांचे दुर्लक्ष असते, वर-वर ते सामान्य वाटतात पण आतून ते नेहमी त्या आंतर-आत्माशी मनाला बांधून असतात.
रामकृष्ण-परमहंस यांचे उदाहरण यासाठी पुरेसे आहे. मागील प्रकरणात त्याबद्दल लिहिले आहे, ते सामान्य जीवनात असामान्य तत्वाशी एकरूप झालेले दिसतात. त्यांनी त्यांच्या मनाला त्या आत्म-शक्तीशी एकरूप केलेले आहे, जे काही आहे ते तिच्या इच्छेने आहे, तिच्या मनात जसे असेल तसे होईल, इतके ते आंतर-शक्तीशी एकरूप झालेले दिसतात. आपण जी कुंडलिनी शक्ति म्हणतो, ती आपणासाठी प्रथम पायरी आहे, त्यासाठी आपल्याला शून्य-तत्वात विलीन व्हावे लागते. नंतर एक-एक चक्र पार करत डोक्यावरील स्थानावर यावे लागते, त्यानंतर आपण ‘भाव-समाधीत’ विलीन होतो. इथे रामकृष्ण-परमहंस सदा त्या ‘भाव-समाधीत’ मग्न रहात, यावरून लक्षात येते की रामकृष्ण-परमहंस त्या सुप्त-शक्तीशी किती तद्रूप पावले होते याची कल्पना येते. त्यांचे सर्व व्यवहार हे त्यांच्या भाव-समधीतच चाललेले असत.
ही भाव-समाधी म्हणजेच आपल्या बाह्य-मनास त्या आंतर-आत्मात विलीन करणे. आपण सामान्य जीवाला त्या भाव-विश्वात इतके विलीन करू शकत नाही, कारण आपण आपल्या दैनदीन जीवनात गुरफटलेले आहोत. पण थोडा वेळ जरी आपल मन ‘त्या भावात’ राहिले तरी मनास मानसिक शांती लाभेल यात शंका नाही. आपण नेहमी आपल्या दैनदीन बुरसटलेल्या विचारात वावरत असतो. त्यातून मनाला आपण बाहेर काढत नाही. त्यामुळे जीवाला शांती कशी लाभणार? त्यासाठी ध्यान-धारणा महत्वाची आहे.
आपल्याला माहीत आहे, लहान मुलांचे मन कोमल-भाव, आणि निष्पाप असते. असे मन आपल्याला जोपासता येऊ शकते का? मनाची तशी ठेवण ठेवता येईल का? दिवसातून काही वेळ तरी आपण लहान मुलांचा भाव आपल्यात ठेवला पाहिजे. जेव्हा तुम्ही मनाची तशी ठेवण ठेवाल तर निश्चित तुम्हाला समाधान लाभेल. ही त्या कोमल मनाची ताकत असते, जी आपल्याला तणावातून थोडा वेळ तरी मुक्त करते, निर्भय करते, जसे लहान मूल निर्भयतेने सापाशी खेळते, त्याला भीती वाटत नाही. कारण त्याच्या मनाची आणि सापाच्या मनाची एकसमंत तत्व एकरूप झालेले असते, हे त्याच्या मागचे कारण आहे. सापाला जाणीव झालेली असते, याच्या पासून मला धोका नाही. मुलाच्या मनाचा ‘निष्पाप भाव’ त्या सापाला जाणीव करून देतात, इथे काही धोका नाही.
त्याच ठिकाणी आपण उभे रहात नाही, कारण आपले मन धोक्याची जाणीव करून देत असते, त्यामुळे आपल्या मनाच्या घाबरलेल्या लहरी (waves) त्या सापा पर्यंत पोहोचतात, आणि त्या घाबरलेल्या लहरी सापाला समजतात आणि त्यालाही धोका जाणवू लागतो. आणि तो फणा काढून उभा राहतो. आपल्या ठिकाणी लहान मुलाचा ‘निष्पाप’ भाव त्या वेळी नसतो. हीच ती “निष्पाप मनाची” ताकत असते.
0 टिप्पण्या